सरसंघचालकांविरोधात काँग्रेसची पोलिसांत तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विरोधात काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी राज्यसभा खासदार व्ही. हनुमंता राव यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.  भागवत यांनी हिंदुस्थानातील 130 कोटी नागरिक हिंदू आहेत असे विधान नुकतेच एका जाहडर सभेमध्ये केले होते. हे विधान देशातील केवळ मुस्लिम, शीख, पारसी आदींच्या भावना आणि श्रद्धेला धक्का देणारे नाही तर संविधानाच्या मूळ तत्त्वांविरोधात आहे. या विधानामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे राव यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, ही तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली आहे. यावर कायदेतज्ञांचे मत घेऊन पुढील कारवाई केली जाईल, असे एल. बी. नगर पोलीस ठाण्याचे अशोक रेड्डी यांनी सांगितले.