8 पाकिस्तानी हिंदू शरणार्थींना मिळाले हिंदुस्थानचे नागरिकत्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून गदारोळ सुरू आहे. अशा वेळी पाकिस्तानच्या 8 हिंदू शरणार्थींना हिंदुस्थानचे नागरिकत्व देण्यात आले आहे. गेली 19 वर्ष ते हिंदुस्थानात निर्वासित म्हणून राहत होते. हे सर्व निर्वासित राजस्थानच्या कोटा शहरात राहत होते.

2000 साली हे आठ शरणार्थी हिंदुस्थानात आले. राज्याच्या गृह विभागाकडून 8 शरणार्थींना नागरिकत्व देण्याचे आदेश दिले होते अशी माहिती कोटाचे जिल्हाधिकारी ओम प्रकाश कसेरा यांनी दिली. गेली 19 वर्षे आम्ही हिंदुस्थानात आसरा घेतला आहे, आम्हाला कुठल्याच प्रकारचा त्रास झाला नाही. हिंदुस्थानचे नागरिकत्व मिळाल्याने आम्ही खूश आहोत अशी प्रतिक्रिया या शरणार्थींनी दिली आहे.