
पुण्यातील भीमा कोरेगाव या ऐतिहासिक युद्धाला आज 202 वर्षे पूर्ण झाले. त्यानिमित्ताने पोलिसांनी भीमा कोरेगामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून या भागातील इंटरनेट बंद ठेवण्यात आले आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे भीमा कोरेगावला जाऊन त्यांनी विजयस्तंभाला अभिवादन केले आहे.
अजित पवार म्हणाले की, नवीन वर्षात राज्यात महिला सुरक्षा, रोजगार देऊन शेतकरी आत्महत्या थांबवण्याचा प्रयत्न करू. विजय स्तंभाला अभिवाद करण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि मंत्री नितीन राऊतही पोहोचणार आहेत.
आज, भीमा-कोरेगाव स्थळाला भेट दिली. १ जानेवारी १८१८ मध्ये याठिकाणी झालेल्या लढाईत वीरमरण पत्करणाऱ्या आणि अतुलनीय शौर्य गाजवून विजय मिळवणाऱ्या महार रेजिमेंटच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या विजयस्तंभाला पुष्पहार अर्पण करून वीर शहीदांना अभिवादन केलं. pic.twitter.com/HY6iECc746
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 1, 2020
भीमा कोरेगामध्ये कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून प्रशासाने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांनी 250 व्हॉट्सऍप ग्रुप्सना नोटीस पाठवली आहे. तसेच 750 लोकांनाही नोटीस बजावली आहे. त्या भागाती 15 फेसबुक खाती बंद करण्यात आले असून इंरनेटसेवाही बंद करण्यात आली आहे. 163 जणांना जिल्हाबंदी घातली असून या भागात 10 हजार पोलिसांचा पहारा आहे.



























































