
अंबरनाथ तालुक्यातील पोसरी या गावी कल्याण येथील बी.के.बिर्ला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) विशेष निवासी शिबीरात नदीवर बंधारा (धरण) बांधुन “पाणी अडवा,पाणी जिरवा” ही संकल्पना प्रत्यक्ष राबवली. हा बंधारा बांधल्याने पोसरी गावाला फायदा होणार आहे. शिबिराला एनएसएस चे 85 विद्यार्थी 24 डिसेंबरपासुन सामाजिक बांधीलकीसोबत श्रमप्रतिष्ठेचे मूल्य पोसरी गावात रूजवले. त्याचसोबत या विद्यार्थांनी गावात रक्ततपासणी शिबीर आणि व्यसनमुक्ती असे विविध प्रकारचे कार्यक्रम राबवून ग्रामस्थांना जागृत करण्यात आले. वकृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच पथनाट्य स्पर्धा घेऊन विद्यार्थांनी पोसरी या गावी समाजप्रबोधन केले. तसेच या शिबिरात बी.के.बिर्ला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पाटील सर, संचालक डॉ. नरेश चंद्र आणि उपप्राचार्य वाडेकर सर यांनी भेट दिली.ही सदर माहीती एनएसएस चे कार्यक्रम आधिकारी डाॅ.संदेश जायभाये सर यांनी दिली …

































































