
प्रसिद्ध गायिका ब्रिटनी स्पिअर्सने बिकीनीत अॅक्रो योगा केला असून त्याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र ब्रिटीनीने केलेला योगा हा नेटकऱ्यांनी योगा नाही तर डान्स वाटत आहेत. तर काहिंनी तिला योगाचे धडे घ्यायचा सल्ला दिला आहे.
ब्रिटीनी ही प्रसिद्ध गायिका असून गेल्या काही वर्षांपासून ती मानसिक आजाराने त्रस्त आहे. नुकतीच ब्रिटनी तिच्या कुटुंबासोबत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी फिरायला गेली होती. परत आल्यानंतर तिने यावर्षी योगा करायचा संकल्प केला आहे. त्यासाठी ती अॅक्रो योगा करणार आहे. या व्हिडीओ सोबत तिने चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
























































