
मालवण येथील प्रभारी सिंधुदुर्ग जिल्हा सहाय्यक मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त व परवाना अधिकारी शिवराज चव्हाण (रत्नागिरी) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्ग यांनी लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. दरम्यान, दोन्ही मत्स्य अधिकारी यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई नंतर मत्स्य विभागात खळबळ उडाली आहे.
पर्ससीन मासेमारी बोटींवर कारवाई न करण्याच्या अटीवर एका मासेमारी व्यवसाईकाडून ५ लाख रुपये लाचेची मागणी प्रदीप वस्त व शिवराज चव्हाण यांनी केली होती. त्यापैकी २ लाख रुपये शनिवारी देण्याचे ठरले होते. याबाबत त्या व्यवसाईकाने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. याबाबत तक्रारी नंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचला. नुसार लाचेचा पहिला हप्ता २ लाख रुपये मालवण येथील मत्स्य कार्यालयात स्वीकारताना मत्स्य अधिकारी वस्त व चव्हाण यांना लाचलुचपत पथकाने ताब्यात घेतले.

































































