
लोणंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पाडेगाव (ता. खंडाळा) गावच्या हद्दीमध्ये कॅनॉलच्या बाजूला एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला आहे. या मृतदेहाच्या छातीवर गोळी मारून खून केल्याचे दिसून येत आहे. या घटनेने लोणंद परिसरात खळबळ उडाली आहे.
लोणंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या व्यक्तिचा खून करून मृतदेह या ठिकाणी आणून टाकल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पाडेगाव (ता.खंडाळा) गावचे हद्दीत कॅनालजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह छिन्न विछन्न अवस्थेत असल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अज्ञात व्यक्तीच्या पोटात गोळी मारून खून केल्याचे दिसून येत आहे. मृतदेहावर जखमा आढळून आल्या आहेत. पोलीस पंचनामा करत असून कोणाचे नातेवाईक बेपत्ता झाले असल्यास त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


























































