लातूरात बंद घर चोरट्यांनी फोडले, 3 तोळे सोन्याचे, 5 तोळे चांदीचे दागीने पळवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील प्रकाश नगर भागातील बंद घर चोरट्यांनी फोडले. 3 तोळे सोन्याचे दागीने आणि 5 तोळे चांदीचे दागीने चोरुन नेण्यात आले. या चोरी प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

चोरी प्रकरणी अनिल बंकट पुंरी यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, ते आपले घर बंद करुन रात्र पाळी असल्याने महावितरणमध्ये कामास गेले होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घर फोडले. दराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाट तोडून आतील 3 तोळे वजनाच्या सोन्याच्या 5 अंगठ्या, चांदीचे 5 ताट, 10 वाट्या, करंडा, 1 पंचमाळ, 2 समई असा सुमारे 5 तोळे वजनाचे साहित्या चोरुन नेले. कामावरुन सकाळी परत आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या चोरी प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कर्मचारी कांबळे हे करीत आहेत.