Happy Birthday द वॉल! पदार्पणाच्या लढतीत निवृत्ती घेणारा खेळाडू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकेकाळचा हिंदुस्थानी संघातील सर्वात भरवशाचा खेळाडू, ‘द वॉल’ असा नावलौकिक असणारा राहुल द्रविड याचा आज 47 वा वाढदिवस आहे. 11 जानेवारीस 1973 ला जन्मलेल्या राहुल द्रविडने आपल्या शानदार डिफेन्सच्या बळावर ‘दिवार’ ही उपाधी मिळवली. 20 जून, 1996 ला क्रिकेटचा मक्का समजला जाणाऱ्या इंग्लंडमधील प्रसिद्ध लॉर्डस मैदानावरून राहुल द्रविड याने आपल्या कसोटी कारकीर्दीला सुरुवात केली.

द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीमध्ये 24 हजार धावांचा पाऊस पाडला. फलंदाजासह स्लिपमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणूनही त्याच्या नावाचा डंका कायम गाजत राहिला. द्रविडच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेण्याचाही विक्रमही आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केल्यानंतर द्रविड सध्या हिंदुस्थानी क्रिकेटची नवीन फळी उभारण्याचे काम करत आहे. द्रविड सध्या अंडर-19 हिंदुस्थानी संघाचा प्रशिक्षक आहे. जाणून घेऊया द्रविडच्या शानदार कारकीर्दीबाबत…

1. राहुल द्रविड असा एकमेव खेळाडू आहे ज्याने आपल्या पदार्पणाच्या लढतीतच निवृत्ती घेतली. द्रविडने आपला पहिला आणि अंतिम टी-20 सामना इंग्लंडविरुद्ध 31 ऑगस्ट, 2011 ला खेळला. या लढतीत द्रविडने 21 चेंडूत 31 धावांची खेळी केली होती.

dravid6

2. 2004-05 साली घेण्यात आलेल्या एका ऑनलाईन सर्व्हेमध्ये राहुल द्रविडला हिंदुस्थानचा ‘सेक्सी स्पोर्टसपर्सन’ हा किताब मिळाला होता. द्रविडने सिक्सर किंग युवराज सिंह आणि टेनिसपटू सानिया मिर्झा यांना धोबिपछाड देत या किताबावर कब्जा केला होता.

dravid3

3. राहुल द्रविडचे वडील एक जाम बनवणाऱ्या कंपनीमध्ये काम करत होते, त्यामुळे राहुल द्रविडचे टोपन नाव ‘जॅमी’ असे पडले. राहुलच्या टोपन नावावरून बंगळुरूमध्ये एक स्थानिक स्पर्धाही आयोजित केली जाते. जॅमी कप नावाने होणाऱ्या या स्पर्धेत ‘मॅन ऑफ द मॅच’ ऐवजी ‘जॅमी ऑफ द मॅच’ हा किताब देण्यात येतो.

dravid8

4. राहुल द्रविड आपल्या विकेटचे महत्त्व जाणून होता. एकदा 13 वर्षाचा असताना राहुल द्रविड बाद झाल्यानंतर भर मैदानात रडला होता आणि रडत रडत पवेलियनमध्ये आला होता. तो क्षण अत्यंत लाजिरवाणा होता, असे द्रविडने आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरु करताना सांगितले होते.

dravid9

5. क्रिकेटमध्ये कारकीर्द सुरू करण्यापूर्वी राहुल द्रविड हिंदुस्थानचा राष्ट्रीय खेळ हॉकी खेळायचा हे अनेक लोकांना माहिती नाही. शाळेच्या दिवसांमध्ये द्रविड ज्यूनिअर हॉकी स्टेट संघाकडून खेळायचा.

dravid0

6. 1999 ला झालेल्या वर्ल्डकपमध्ये राहुल द्रविडने सर्वाधिक धावा केल्या होत्या. द्रविडने 8 लढतींमध्ये 2 शतक आणि 3 अर्धशतकांच्या मदतीने 461 धावा चोपल्या होत्या.

dravid7

7. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर आहे. द्रविडने कसोटी क्रिकेटमध्ये एकून 31258 चेंडूंचा सामना केला आहे. द्रविडने आपल्या कारकीर्दीत एकून 164 कसोटी लढतींपैकी 163 कसोटी लढती टीम इंडियाकडून खेळल्या. एक कसोटी सामना त्याने आयसीसी विश्व इलेव्हन संघासाठी खेलला होता आणि यात त्याने शून्य व 23 धावा केल्या.

dravid11

8. राहुल द्रविड एवढा संथ खेळायचा की टीकाकार त्याला एक दिवसीय क्रिकेटसाठी फिट समजत नव्हते. परंतु द्रविडने 10889 धावा चोपत टीकाकारांचे तोंड गप्प केले.

dravid2

9. कसोटी क्रिकेटमध्ये द्रविडची शिकार सर्वात जास्त ऑस्ट्रेलियन फिरकीपटून शेन वॉर्न याने केली आहे. वॉर्नने आठ वेळा द्रविडला बाद केले आहे, तर ऑस्ट्रेलियाच्याच ब्रेटलीने सात वेळा बाद केले.

dravid

10. जगभरात आपल्या फलंदाजीने भल्याभल्या गोलंदाजांना पाणी पाजलेल्या द्रविडला आपल्या होम पिचवर एकही शतक ठोकता आलेले नाही. द्रविडने बंगळुरूतील एम चिन्नास्वामी मैदानावर 8 कसोटी खेळल्या असून यात 60 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

dravid5