फडणवीस आणि त्यांच्या चौकडीने मला संपविण्याचा प्रयत्न केला, खडसे यांचा सनसनाटी आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
eknath-khadse

‘भाजप पक्ष उभारणीसाठी माझे खूप मोठे योगदान आहे. पक्षानेही मला भरभरून दिले असल्याने मी पक्षावर नाराज नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या चौकडीने मला संपविण्याचा प्रयत्न केला’, असा सनसनाटी आरोप भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला.

भाजपचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे आज नगर जिल्हा दौर्‍यावर आले असता शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी आले होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. परळीसारखे पक्षातील अंतर्गत बंडाळीबाबतचे अनेक मुद्दे आहेत. मात्र योग्य वेळ आल्यानंतर मी ते बोलीन’, असे सांगत त्यांनी फडणवीस यांच्यावरील नाराजी कायम असल्याचे सांगितले.

आपण बंड करणार का? या प्रश्नावर वेळ आल्यावर निर्णय घेऊ, असे खडसे म्हणाले. पाच वर्षांपासून माझ्यावर अन्याय झाला आहे. पक्षाने अन्याय केलेला नाही, तर माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या चौकडीकडून तो झाला असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. विधानसभेत भाजप-शिवसेनेला बहुमत मिळाले होते, मात्र फडणवीस आणि त्यांच्या टीममुळे भाजपचे नुकसान झाल्याचे ते म्हणाले.