
माझा स्वभाव शांत आहे, पण अनेकांना काटत नाही. लहानपणी मी खोड्या करत नक्हतो, पण खोड्यांचा साक्षीदार असायचो. मी ‘सीझनल’ खेळ खेळायचो. बॅटिंग केली की फिल्डिंग करत नव्हतो. पळून जात होतो, अशा शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत आपण अपघाताने राजकारणात आलो असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कबूल केले. मी ‘मोरया युथ फेस्टिव्हल’च्या कार्यक्रमाला पुन्हा येईन! असे सांगताच संपूर्ण सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.
अभिनेते राहुल सोलापूरकर आणि फाऊंडेशनचे अध्यक्ष ऍड. सचिन पटवर्धन यांनी त्यांची मुलाखत घेतली त्यावेळी ते बोलत होते.
वॉर्ड अध्यक्षापासून राजकारणात कामाला सुरुवात केली. शाळेत असताना नाटकात सहभागी व्हायचो. त्यामध्ये सुदैवाने दोनवेळा राजकीय नेत्याची भूमिका माझा वाट्याला आली होती. मला गाणे ऐकण्याचा छंद असून सुमारे दोन हजार गाणी पाठ आहेत. त्यातही किशोरकुमारची गाणी आजही तोंडपाठ आहेत. अंताक्षरीत मी कधीच हरू शकत नाही, असा दावाही फडणवीस यांनी केला.


























































