
बॉलिवूड अभिनेता आणि गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार सनी देओल बेपत्ता झाले आहेत. अशा आशयाचे पोस्टर मतदारसंघात लागले आहेत.
Punjab: ‘Missing’ posters of Sunny Deol, BJP MP from Gurdaspur constituency, seen in Pathankot pic.twitter.com/SHGpMsxlaq
— ANI (@ANI) January 13, 2020
भाजप खासदार सनी देओल यांनी अनेक दिवस आपला मतदारसंघ गुरुदासपरमध्ये भेट दिली नहई. त्यामुळे काही लोकांनी सनी देओल बेपत्ता असल्याचे पोस्टर लावले आहेत. तसेच सनी देओल यांनी गेली अनेक दिवस मतदारसंघाचा दौरा न केल्याने विरोधी पक्षानी त्यांच्यावर टीका केली आहे. या सगळ्यात अजूनही सनी देओल यांची कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. पंजाबी समुदायाचा लोहरी या सणाच्या शुभेच्छा सध्या सनी देओल यांनी दिल्या आहेत.
लोहड़ी के इस पावन अवसर पर आप सभी को हार्दिक शुभकामनाए।
ਲੋਹੜੀ ਦੇ ਇਸ ਪਵਿੱਤਰ ਦਿਹਾੜੇ ਦੀ ਆਪ ਸੱਭ ਨੂੰ ਲੱਖ ਲੱਖ ਵਧਾਈਆਂ।#HappyLohri #apnagurdaspur pic.twitter.com/RPgdme0azz— Sunny Deol (@iamsunnydeol) January 13, 2020
या पोस्टरचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी ट्विटरवर सनी देओल यांना ट्रोल केले आहे. सनी पाजीला पाकिस्तानमध्ये शोधा, तिथे हँडपंप उखडण्यासाठी ते गेले असावे असा टोला काहींनी लगावला आहे. तर काहींनी म्हटले आहे की, फेस वॅल्यू असल्यावर सगळी कामे होतात अस भाजपला वाटतं.
सनी देओल यांना शेवटचे नागपूरमध्ये पाहण्यात आले होते. तिथे राष्ट्रीय युवा दिना निमित्त खासदर क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीसोंब ते होते. तसेच सनी देओल अनेकवेळा नागपुरातील रेशीमबागेतील संघाच्या कार्यालयातही पाहिले गेले आहे.
नागपुर में खासदार (सांसद) क्रीडा महोत्सव का उद्धाटन सांसद व अभिनेता @iamsunnydeol और @BabitaPhogat की उपस्थिति में हुआ। नागपुर में 13 दिनों तक चलने वाले इस महोत्सव में 38 हजार खिलाड़ी हिस्सा लेंगे, इसका आयोजन शहर के 39 स्थानों पर होगा, जिसमें 32 प्रकार के खेल होंगे। #KheloNagpur pic.twitter.com/DSNao8D16Y
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) January 12, 2020























































