टाटा, वाडिया यांच्यात समेट; वाडिया यांनी 3 हजार कोटींचा मानहानीचा खटला घेतला मागे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉम्बे डाइंगचे संचालक नस्ली वाडिया यांनी रतन टाटा यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेला तब्बल 3 हजार कोटींचा मानहानीचा खटला अखेर मागे घेतला आहे. या दोघांमध्ये सोमवारी समेट झाली. वाडिया यांचा अपमान करण्याचा आपला उद्देश नव्हता असे टाटा यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर सांगितले. अशाप्रकारे दोन प्रमुख उद्योजकांमधील वादळ शमले. सारयस मिस्त्राr यांना टाटा सन्सच्या संचालकपदावरून हटविल्यानंतर रतन टाटा आणि टाटा ग्रुपच्या इतर सदस्यांनी आपल्यावर अपमानजनक टीका केली होती. सायरस आणि माझी मिलीभगत असल्याचा आरोप माझ्यावर करण्यात आला, असे वाडिया यांचे म्हणणे होते.