
पश्चिम रेल्वेवर धावणारी देशाची दुसरी प्रायव्हेट ट्रेन अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल ‘तेजस एक्सप्रेस’ला मिळाणारा प्रतिसाद पाहून या गाडीला आणखी एक एसी चेअर कारचा डबा जोडण्यात आला आहे. या गाडीला दोन एक्झुकेटिव्ह क्लासचे डबे आणि आठ चेअर कारचे डबे होते. आता आणखी एक चेअर कारचा डबा जोडण्यात येणार आहेत. अहमदाबाद-मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ट्रेन क्र. 82902 82901 या तेजस एक्सप्रेस ट्रेनच्या बुकिंगसाठी आयआरसीटीसीच्या बेवसाईटशिवाय आता लास्ट मिनीट बुकिंगकरिता तेजसचा थांबा असलेल्या स्थानकांवर करंट बुकिंग काऊंटरही उघडण्यात आले आहेत. तसेच प्रवाशांची वाढती मागणी पाहून आता एसी चेअर कारचा आणखी एक डबा 24 ते 29 जानेवारी दरम्यान जोडण्यात येणार आहे. या गाडीत एक्झुकेटिव्ह क्लासचे (प्रवासी क्षमता 56) दोन डबे तसेच एसी चेअर कारचे (प्रवासी क्षमता 78) आठ डबे अशी या गाडीची एकूण प्रवासी क्षमता 736 इतकी आहे.
































































