जम्मू-कश्मीरचे आणखी चार नेते सहा महिन्यांनी नजरकैदेबाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीर प्रशासनाने जवळपास सहा महिन्यांनी आणखी चार नेत्यांची नजरकैदेतून सुटका केली. 5 ऑगस्टला कलम 370 हद्दपार केल्यानंतर लगेचच या नेत्यांना नजरकैदेत ठेवले होते. नॅशनल कॉन्फरन्सचे अब्दुल मजीद, गुलाम नबी बट, मोहम्मद शफी आणि मोहम्मद युसूफ बट अशी सुटका झालेल्या नेत्यांची नावे आहेत.

राज्य प्रशासनाने गेल्या महिन्यात घरात नजरकैदेत ठेवलेल्या चार नेत्यांची सुटका केली होती. जम्मू-कश्मीरचे एक माजी मंत्री आणि विधानसभेचे माजी उपाध्यक्ष यांच्यासमवेत चार नेत्यांना 16 जानेवारीच्या रात्री मुक्त करण्यात आले होते.