‘दंगल गर्ल’ झायरा वसीम (Zaira Wasim) हिने धर्माचे कारण देत बॉलिवूडला रामराम ठोकला असला तरी ती सोशल मीडियावर सक्रीय आहे. झायराने नुकतीच जम्मू-कश्मीरबाबत एक पोस्ट केली आहे. यात तिने कश्मीरमधील सद्य परिस्थितीवर भाष्य केले आहे.
झायरा इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, कश्मीरी नागरिकांचे आयुष्य त्रासदायक, समस्यांनी घेरलेले आणि बंदीवानासारखे का असते? हे एवढे सहज कसे झाले? अशासारखे शेकडो प्रश्न डोक्यामध्ये येतात आणि निराश होऊन जाते. ती पुढे म्हणते, कश्मीर सातत्याने आशा आणि निराशाच्या फ्रस्टेशनमध्ये अडकलेले आहे. निराशा आणि दु:खाच्या जागी खोटी शांतता पसरवली जात आहे. कश्मीरींचे अस्तित्वाचा प्रश्न आहे, परंतु हे असे जग आहे जिथे आपल्या स्वातंत्र्यावर बंदी घालणे सोप्पे आहे.
झायरा आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिते, आपल्याला अशा जगात का राहावे लागते जिथे आपले आयुष्य आणि इच्छाशक्तींचा बिमोड करण्यासह त्यांना नियंत्रित केले जाते? आमचा आवाज दाबणे एवढे सोप्पे आहे का? आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर पडदा टाकणे एवढे सोप्पे आहे का? आम्हालाही आमचे मत मांडण्याचा अधिकार का नाही? असा ती उपस्थित करते. तसेच प्रश्न विचारा.. आमचा आवाज दाबला गेला आहे आणि कधीपर्यंत… असेही ती पुढे आपल्या पोस्टमध्ये नमूद करते.
याआधी गेल्यावर्षी अल्लाहच्या मार्गावरून भटकले होते, असं सांगत झायरा वसीम हिने बॉलीवूडला अलिवदा केला होता. ‘दंगल’ चित्रपटामध्ये तिने आमिर खान याच्यासोबत केलेली भूमिका चांगलीच गाजली होती.