महात्मा गांधींना शिव्या देणारे रावणाची औलाद, काँग्रेस खासदाराच्या टीकेमुळे लोकसभेत गदारोळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस खासदार अधीर रंजन यांच्या एका वक्तव्यामुळे लोकसभेत चांगलाच गदारोळ झाला. जे लोक महात्मा गांधींना शिव्या देत आहेत ते रावणाची औलाद आहेत अशी त्यांनी टीका केली. तसेच हे लोक भगवान रामाची पूजा करणार्‍यांचा अपमान करत आहेत असेही अधीर रंजन चौधरी म्हणाले.

काल भाजप खासदार अनंत हेगडे यांनी गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीला नाटक म्हटले होते. त्यावरून आज लोकसभेत वाद झाला. त्यावर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, आज हे लोक महात्मा गांधींना शिव्या देत आहेत. रामाची पुजा करणार्‍यांचा हा अपमान असून ते रावणाची औलाद आहेत.” रावणाची औलाद या वाक्यावर भाजपने चांगलाच विरोध दर्शवला.

भाजप खासदार अनंत हेगडे यांच्या वादग्रस्त विधानामुळे इतर विरोधी पक्षांनी गदारोळ केला. त्यामुळे संसदेचे कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते.