मुद्दा – ऐतिहासिक परंपरेचे दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 >> राजाराम पवार

एकाहून अधिक विषयांशी संबंधित वस्तू, पुरातन शिल्पे, ऐतिहासिक परंपरा, पुरातन संस्कृती, ऐतिहासिक शास्त्र अशा विविध वस्तूंचा संग्रह असलेले बहुआयामी संग्रहालय म्हणजेच पुणे शहरातील महात्मा फुले वस्तुसंग्रहालय! या वस्तुसंग्रहालयात शेती आणि शेतीची विविध साधने, हस्तकला वस्तू, दागदागिने, वनीकरण, दगडातील कोरीव काम, संगमरकरी पुतळे, तैलचित्रे, धातूंची शिल्पे याबरोबरच महाराष्ट्राची कला इतिहास संस्कृती सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचे दर्शन घडवणारे हे संग्रहालय असून विविध प्रकारच्या प्राण्यांच्या शरीराचे नमुने हे या संग्रहालयाचे प्रमुख आकर्षण आहे. विविध प्रकारच्या कला, धार्मिक परंपरा व ऐतिहासिक ठेवा यांचे जतन करण्याचे महत्त्वपूर्ण काम या संग्रहालयामार्फत झाले आहे. या संग्रहालयातील प्राचीन सांस्कृतिक अवशेष येणाऱयांच्या ज्ञानात भर घालत आहेत.

पुणे प्रदर्शन समितीने आयोजित केलेल्या औद्योगिक प्रदर्शनानंतर पुणे औद्योगिक संग्रहालय या नावाने हे संग्रहालय 1875 मध्ये स्थापन झाले आहे. 1885 साली या वस्तुसंग्रहालयाचे ‘लॉर्ड रे औद्योगिक वस्तुसंग्रहालय’ असे नामकरण करण्यात आले होते. त्या वेळी या संग्रहालयाचे व्यवस्थापन पश्चिम भारत औद्योगिक संघटना या संस्थेकडे होते. 1895 साली संग्रहालयाचे व्यवस्थापन पुणे शहर नगरपालिकेकडे आले. नगरपालिकेने 1930 मध्ये अरे मार्केट टॉकरवरील करच्या मजल्यावर संग्रहालयाकरिता जागा उपलब्ध करून दिली आणि या संग्रहालयाच्या विकासासाठी वार्षिक अनुदान तत्त्वावर आर्थिक मदतही देण्यास सुरुवात केली. पुढील काळात संग्रहालयाचा जलद गतीने विकास होत गेल्याने या संग्रहालयाचे व्यवस्थापन योग्य रीतीने व्हावे यासाठी मुंबई राज्य शासनाने 1947 साली लॉर्ड रे महाराष्ट्र औद्योगिक विकास संग्रहालय अधिनियम, 32 अमलात आणला. त्यानंतर 1964 साली या कस्तुसंग्रहालयाची नकीन इमारत उभारण्यात आली. तसेच या वस्तुसंग्रहालयात विस्तार आणि उपक्रम यांना चालना देण्यासाठी महाराष्ट्राचा इतिहास, कला आणि संस्कृती या विभागाची जोड देणे शक्य व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने 1968 साली महात्मा फुले संग्रहालय, पुणे अधिनियम क्रमांक 18 अमलात आणला. या अधिनियमातील तरतुदीनुसार या संग्रहालयाचे रूपांतर आज कस्तुसंग्रहालयामध्ये झाले आहे.

या संग्रहालयाची सुरुवात औद्योगिक संग्रहालय म्हणून झाल्याने संग्रहालयात औद्योगिक विषयावरील वस्तू अधिक प्रमाणात प्रदर्शित केलेल्या आहेत. यात काच, फायबर, इन्सुलेशन, प्लॅस्टिक, रेशीम कॉटन, कस्त्र्ाालंकार, व0नस्पती तेल, खनिज तेल, रबर तसेच अभियांत्रिकी विषयांवरील वस्तूंमध्ये कार्यशाळेतील हत्यारे, उपकरणे, बॉल व रोल बेअरिंगचे नमुने, बॉयलर, बाष्पयंत्र प्रतिकृती, विविध प्रकारचे पंप, पाणीपुरवठा व बांधकाम प्रतिकृतींचा संग्रह जतन करण्यात आला आहे.

कुटिरोद्योग विभागांमध्ये लाकडी कोरीव काम केलेल्या वस्तू, संगमरकरी वस्तू, दगडावरील कोरीव काम, चिनी मातीच्या वस्तू, कपडय़ावरील भरतकाम, बांबू आणि लाकडी वस्तू, चंदन आणि हस्तिदंतावरील कोरीव काम अशा प्रकारच्या प्राचीन व सांस्कृतिक वस्तूंचा ठेवा या ठिकाणी अनुभवण्यास मिळतो. या संग्रहालयात शेतीची अवजारे, खत, तणनाशके, कीटकनाशके, बुरशीनाशके आणि यांचा कापर करण्यासाठी लागणारी साधने यांचा महत्त्वपूर्ण संग्रह, त्याबरोबरच विविध पाणीपुरवठा पद्धती दर्शकिणारी प्रतिकृती तसेच गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी यांच्या सुधारित जाती, कापूस, नारळ, तंबाखू आणि तेलबिया यांचे नमुने अनुभवण्यास मिळतात. साखर कारखान्याच्या प्रतिकृतीसोबतच या उद्योगाशी संबंधित उत्पादनांचे नमुने, खोबरेल तेल आणि गोडेतेलाच्या कारखान्यांच्या प्रतिकृती, कृषी उद्योगाला पूरक मधमाशी पालन व्यवसायासाठी लागणारी उपयुक्त साधने, रेशीम किडय़ांचे कोश, धागे आदींचे नमुने यांचाही संग्रह या ठिकाणी आहे. कुक्कुटपालन व्यवसायासाठी उपयुक्त अशा चार जातींच्या कोंबडय़ांच्या जोडय़ा येथे प्रदर्शित केल्या आहेत.

महाराष्ट्राचा इतिहास मांडणारी काही जुनी शास्त्र येथे आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या संग्रहालयात असलेल्या वस्तूंविषयी माहिती देणारे ग्रंथ व अन्य साहित्य असलेले सुसज्ज ग्रंथालय या संग्रहालयात असून यामध्ये पुस्तकांच्या जोडीला फोटो, तक्ते, चित्रे, नकाशे, चित्रपती, विविध प्रकारचे साहित्य जमा केलेले आहे. या ग्रंथालयातील तक्ते, प्रदर्शनीय वस्तूंच्या ज्ञानाचा लाभ विद्यार्थ्यांसह नागरिकांना करून देण्यासाठी तज्ञ व्यक्तींच्या सहकार्याने शैक्षणिक उपक्रम, क्याख्याने, प्रात्यक्षिके, विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विज्ञान वर्गाचे आयोजन अशा प्रकारचे उपक्रम या ग्रंथालयाच्या माध्यमातून राबवले जातात. शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थी सहलीच्या माध्यमातून हे संग्रहालय पाहण्यासाठी येतात. त्याबरोबरच संशोधक, अभ्यासक, नागरिकही या संग्रहालयातील ऐतिहासिक ठेवा अनुभवण्यासाठी येत असतात. संग्रहालयातील ऐतिहासिक वास्तू, साधने, पुरावे हे विविध विषयांतील संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी, शिक्षक यांना महत्त्वपूर्ण ठरत आहेत.