#Coronavirus महारोगाचे ‘वास्तव’ दाखवणारा पत्रकार गायब, चिनी सरकारची केली होती पोलखोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीनमध्ये कोरोना व्हायरसने अक्षरश: धुमाकूळ घातला असून आतापर्यंत 800 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र काही दिवसांपूर्वी चीनमधील दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी कंपनी ‘सेनसेन्ट’चा डेटा लिक झाला होता आणि या डेटानुसार चीन सरकार कोरोना व्हायरसचे वास्तव दडपत असल्याचा आरोप झाला. या डेटामध्ये कोरोनामुळे तब्बल 24 हजार लोकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते, त्यावेळी सरकारची अधिकृत आकडेवारी 600 होती. मात्र जगभरात खळबळ उडाल्यानंतर कंपनीने हा डेटा हटवला. मात्र हा डेटा खरा असण्याची शक्यता बळावली आहे. कारण चीनमध्ये कोरोना व्हायरस किती बळावला आहे याची आणि सरकारी पातळीवर सुरू असलेल्या उपाययोजनांची पोलखोल करणारा एक चिनी पत्रकार अचानक गायब झाला आहे.

‘कोरोना’ 24 देशांमध्ये पसरला, चीनमध्ये बळींची संख्या 811

चेन क्यूएशी (Chen Qiushi) असे गायब झालेल्या पत्रकाराचे नाव आहे. चेन हा एक सामाजिक कार्यकर्ताही असून गुरुवार रात्रीपासून त्याचा पत्ता लागलेला नाही. क्यूएशी कोरोना व्हायरसमुळे हुबेई प्रातातील परिस्थितीवर सातत्याने व्हिडीओ पोस्ट करून माहिती देत होता. या व्हिडीओमध्ये त्याने चिनी सरकारकून या महारोगाशी लढण्यासाठी आवश्यक पावलं उचचली जात नसल्याचा आरोप चेनने केला होता. यानंतर तो गायब झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

चेनने हुबेई प्रांतामध्ये चिनी सरकारकडून लोकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक पावलं उचलले जात नसल्याचा आरोप केला होता. या प्रांतामध्ये व्हायरसपासून वाचण्यासाठी आवश्यक मास्क, वैद्यकीय मदत आणि हॅजमॅट सूटची कमतरता असल्याचे चेनने व्हिडीओमध्ये म्हटले होते. तसेच डॉक्टरांकडे तपासणीसाठी आवश्यक उपकरणंही नसल्याचे त्याने म्हटले होते.

कोरोनावर हिंदुस्थानी संशोधक शोधणार लस, एस. एस. वासन यांचे महत्त्वपूर्ण संशोधन

चेन पुढे म्हणतो की, न्याय विभागाचा आणि किंगदाओ पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांचा आपल्याला फोन आला आहे. मी कुठे आहे आणि तपासामध्ये सहकार्य करण्याची मागणी ते करत असल्याचेही चेनने म्हटले आहे. मला भिती वाटत असून माझ्यासमोर कोरोनाचे आव्हान आहे, तर माझ्या पाठी पोलीस आणि सरकारी संस्था असल्याचे चेन सांगतो. हा व्हिडीओ पोस्ट केल्यापासून चेन गायब असून त्याचे काही बरेवाईट झाले असावे अशी शक्यता मित्रांनी बोलून दाखवली. या घटनेनंतर चिनी सोशल मीडियावर #FindQiushi हॅशटॅग सुरू आहे.