Delhi result – दिल्लीत ‘पहले आप’, बाकी साफ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
arvind-kejrival

दिल्लीत मंगळवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. निकालाचे कौल येण्यास सुरुवात झाली आणि सापशिडीच्या पटावर एखाद्या खेळाडूला शिडी मिळून तो झपझप वर पोहोचावा असंच आपच्या बाबतीत झालं आहे. ‘आप’ने आपली जादू कायम असल्याचे दाखवून दिले असून सलग तिसऱ्यांदा दिल्लीची सत्ता मिळवण्यात त्यांना यश आल्याचेच चित्र आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल काय लागणार याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिले होते. आम आदमी पक्ष म्हणजेच आप आणि भारतीय जनता पक्ष म्हणजेच भाजपमध्ये तगडी लढत होती. आज निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. मतमोजणी सुरू होताच आपने मुसंडी मारत अवघ्या 40 मिनिटात सुरुवातीच्या कौलात बहुमताचा आकडा पार केला आहे. दिल्लीत सत्ता स्थापन करण्यासाठी 36 जागा मिळवणं आवश्यक आहे. सुरुवातीचे कौल बघता आप जवळपास 50 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे आपच्या कार्यालयात जल्लोषाचे वातावरण आहे. आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दिल्लीतील पक्ष कार्यालयात पोहोचले आहेत. आपचे कार्यकर्ते जल्लोष साजरा करत आहे.

Live Update साठी पुढील लिंकवर क्लिक करा

Live – दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप सुस्साट, भाजप पाठोपाठ