
न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या एक दिवसीय लढतीत के.एल. राहुल याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन दमदार शतक ठोकले. राहुलने 113 चेंडूत 113 धावांची खेळी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. या शतकासह के.एल. राहुल याने टीम इंडियाचा माजी खेळाडू, ‘द वॉल’ राहुल द्रविड याच्या 21 वर्षांपूर्वीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत सातत्याने अपयशी ठरल्याने विराटने के.एल. राहुलवर यष्टीरक्षणाची अतिरिक्त जबाबदारी दिली. याचा फायदा उठवत राहुलने एकामागोमाग एक चांगल्या खेळी केल्या. मंगळवारीही अखेरच्या लढतीत टीम इंडियाचे तीन फलंदाज 62 धावांवर बाद झाल्यानंतर राहुलने शड्डू ठोकला आणि श्रेयस अय्यरसोबत मिळून मोठी भागिदारी केली. राहुलने शतक ठोकले आणि राहुल द्रविडच्या विक्रमाची बरोबरी केली. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून राहुलचे आशियाबाहेर हे पहिलेच शतक आहे. आशियाबाहेर राहुल द्रविडनंतर शतक ठोकणारा तो टीम इंडियाचा पहिलाच खेळाडू आहे. फिनीशर धोनीसह टीम इंडियाच्या एकाही यष्टीरक्षक फलंदाजाला एकदाही अशी कामगिरी करता आलेली नाही.
न्यूझीलंडने टी-20 मालिकेतील पराभवाचे उट्टे काढले, वन डे मालिकेत हिंदुस्थानला ‘व्हाईटवॉश’
सर्वात प्रथम 21 वर्षांपूर्वी राहुल द्रविड याने यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळताना इंग्लंडमध्ये शतक ठोकले होते. 1999 ला इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये राहुल द्रविड याने 145 धावांची शतकी खेळी केली होती. राहुलने सौरव गांगुलीसोबत (183) मिळून 318 धावांची विक्रमी भागिदारी देखील केली होती. आता 21 वर्षानंतर के.एल. राहुलने या विक्रमाची बरोबरी केली आहे.
आशियाबाहेर धोनीचे शतक नाही
टीम इंडियाचा माजी कर्णधार एम.एस. धोनीने 90 कसोटी, 350 एक दिवसीय आणि 98 टी-20 मध्ये 17 हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. परंतु आशियाबाहेरच्या खेळपट्टीवर धोनीला एकदाही शतक ठोकता आलेले नाही.
#INDvsNZ बुमराहचा फॉर्म ‘गुमराह’, न्यूझीलंडविरुद्ध एका विकेटसाठी तरसला


























































