‘मलंग’ चित्रपटातून गोव्याची चूकीची प्रतिमा रंगवण्यात आली! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘मलंग’ या चित्रपटामधून गोव्याची चूकीची प्रतिमा रगंवण्यात आली आहे. कालच हा विषय माझ्या लक्षात आला. यापुढे ईएसजी अर्थात गोवा मनोरंजन संस्थेमार्फत चित्रिकरणाची परवानगी देताना त्याची स्टोरी पाहिली जणार आहे. ‘मलंग’मधून गोव्याची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचे निदर्शनास आणल्या नंतर सरकारने आता हा निर्णय घेण्याचे ठरवले आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

सिनेमात गोवा कसा दाखवला जाणार हे पाहुनच परवानगी दिली जाणार आहे. गोव्यात कायदा आणि सुव्यस्था उत्तम आहे. इतर चांगल्या गोष्टी दाखवण्यासारखे खुप काही असताना गोव्याची ड्रग्स आणि इतर गोष्टी दाखवून चूकीची प्रतिमा रंगवणे योग्य नाही, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री स्वतः ईएसजीचे अध्यक्ष आहेत. गोव्यात सिनेमाचे चित्रीकरण करण्यापूर्वी संबंधितांना ईएसजीची परवानगी घेणे बंधनकारक असते.