उत्तर प्रदेशमध्ये बस व ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात 13 ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमधील ट्रक व बसची धडक होऊन झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 31 जण जखमी झाले असून त्यातील 12 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

ही बस दिल्लीहून बिहारमधील मोतिहारी येथे जात असताना रात्री दहाच्या सुमारास आग्रा लखनौ महामार्गावर फिरोजाबाद येथे बस चालकाचे बसवरीला नियंत्रण सुटले व बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. या अपघातात 44 जण जखमी झाले होते त्यांना इटावा येथील सैफई रुग्णालयात दाखल केले असता त्यातील 13 जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.