सीएए, एनआरसीचे आता करायचे काय? पश्चिम बंगाल भाजपमध्ये फूट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
modi-shah-tense

देशाच्या राजधानीत ‘सीएए’, ‘एनआरसी’चा मुद्दा चालला नाही. पश्चिम बंगालमध्ये आधीच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे भाजपने सीएए, एनआरसीचा जोर येथे लावू नये असे पक्षाच्या एका गटाचे म्हणणे आहे तर दुसरा गट या मुद्दय़ांच्या बाजूने आहे. त्यामुळे सीएए, एनआरसीचे करायचे काय हा प्रश्न आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला पडला आहे.

पुढील वर्षी पश्चिम बंगाल आणि बिहार विधानसभेच्या निवडणुका आहेत. सीएए, एनआरसीविरुद्ध पश्चिम बंगालमध्ये अनेकदा मोठी आंदोलने झाली आहेत. त्यामुळे या मुद्दय़ांवर पक्षनेतृत्वाने जोर दिला तर विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठी किंमत चुकवावी लागेल असे राज्यातील पक्षाच्या मोठ्या गटाचे म्हणणे आहे. सीएए, एनआरसीचा डाव भाजपवर उलटण्याची शक्यता आहे. दरम्यान, बिहारबाबतही भाजप संभ्रमात आहे. जदयुचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे एनआरसीबाबत प्रतिकूल मत आहे.