एमआयएम ही भाजपची बी टीम, तेजस्वी यादवची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘एमआयएम’चा माजी आमदार वारिस पठाणने गुरुवारी हिंदूविरोधी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. बिहारमधील राजदचे नेते व लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव याने देखील वारिस पठाणच्या अटकेची मागणी केली आहे. यावेळी त्याने पठाण याला फटकारताना एमआयएम हा पक्ष म्हणजे भाजपची बी टीम असल्याची टीका केली आहे.

‘वारिस पठाणचे वक्तव्य निषेधार्थ आहे. त्याला तत्काळ अटक झाली पाहिजे. एमआयएम ही भाजपचीच बी टीम आहे. भाजपचे नेते अनुराग ठाकूर व परवेश वर्मा हे देखील अशीच वक्तव्य करत असतात. त्यांना देखील अटक झाली पाहिजे. जे कुणी भडकाऊ भाषणं करतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे’, अशी टिका तेजस्वी यादव याने केली आहे. दिग्विजय सिंह यांनी देखील भाजपची तुलना एमआयएमसोबत केली आहे. ‘भाजप व एमआयएम हे एक दुसऱ्या सारखे आहेत. दोघेही धार्मिक द्वेष पसरवतात’, अशी टीका केली आहे.

100 कोटींवर (हिंदू) आम्ही 15 कोटी (मुसलमान) भारी पडतील. आम्हाला स्वातंत्र्य दिले जात नसेल तर मिळवावे लागेल, अशी धमकी ‘एमआयएम’चा माजी आमदार वारिस पठाणने दिली होती. पठाणच्या या बेताल वक्तव्यानंतर राजकीय घमासान सुरू झाले आहे.