दिल्लीच्या जाफरबादमध्ये महिलांनी केले CAA विरोधात आंदोलन, मेट्रो स्थानक बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीच्या जाफराबाद मेट्रो स्थानकावर महिलांनी CAA विरोधात आंदोलन पुकारले. आंदोलनात मोठ्या महिला सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे जाफराबाद मेट्रो स्थानक बंद करण्यात आले.

दिल्लीत 500 हून आंदोलकर्त्यांनी दिल्ली रोड बंद केल आहे. तसेच हा कायदा जोपर्यंत मागे घेतला जात नाही तोपर्यंत ए आंदोलन सुरूच राहणार असे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे. हा रस्ता सीलपूरला भागाला मिर्जापूर आणि यमुना विहारशी जोडतो. कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिसांनी मेट्रो स्थानकावर मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

जाफराबाद मेट्रो स्थानकाजवळ सीएए आणि एनआरसी विरोधात मोठ्या संख्येंने महिलांनी अंदोलन केले. महिलांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने वाहतूक ठप्प झाली होती. अनेक महिलांनी हातात तिरंगा घेऊन आझादीच्या घोषणा दिल्या. जोपर्यंत हा कायदा मागे घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.