कोपरगाव उपविभाग आणि ग्रामीणमध्ये महावितरणने पकडले 55 वीजचोर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

वीजबिल वसुली व वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणकडून सोमवारी कोपरगाव शहर व तालुक्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत 32 वीजचोर पकडण्यात आले. त्यांच्याकडून साधारण पाच ते सहा हजार प्रमाणे दोन लाख रकमेची वीजचोरी होत असल्याचे उघड झाले आहे. या ग्राहकांकडून दंड वसूल केला जात आहे. तीन दिवसात दंडाची रक्कम न भरणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्याचे आदेश महावितरणकडून देण्यात आले आहेत, अशी माहिती कोपरगाव ग्रामीणचे उपकार्यकारी अभियंता दिनेश चावडा यांनी दिली आहे.

चावडा म्हणाले म्हणाले, सोमवारी प्रादेशिक संचालक, कोकण विभाग यांच्या आदेशानुसार कार्यकारी अभियंता संगमनेर, दत्तात्रय गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यात सर्व कक्ष अभियंता, कोपरगाव ग्रामीण उपविभाग व 25 जनमित्र यांच्या सहभागाने ही मोठी वीजचोरी शोधण्यात आली. चासनळी कक्षातंर्गत असलेल्या 11 के.व्ही.मंजूर गावठाण व 11 के.व्ही. वडगाव गावठाण फिडरवर घेण्यात आला. यावेळी चासनळी, मंजूर, करवाडी,वडगाव, बक्तरपूर या गावामध्ये वीजचोरी शोधणे व ग्राहक तपासणी केली. एकूण 135 ग्राहकांची तपासणी केली. त्यात विद्युत कायदा 2003 कलम 135 अंतर्गत 32 वीज चोरी केसेस पकडलेल्या आहेत. 32 ग्राहकांचे वीज चोरीचे बिल तयार करण्याचे काम करण्यात येत आहे. ग्राहकास बिल दिल्यानंतर ग्राहकाने तीन दिवसाच्या आत न भरल्यास त्या ग्राहकाविरोधात श्रीरामपूर पोलीस ठाण्यात विद्युत कायदा 2003 कलम 135 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

कोपरगाव शहरादरम्यान कोपरगाव उपविभाग शहर, आरवन कोकणठाण, जेऊर कुंभारी व आर टू मुर्शतपुर असे 23 वीजचोर आढळले असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू असल्याची माहिती कोपरगाव शहर अतिरिक्त कार्यकारी अभियंता भगवंत खरोटे यांनी दिली. कोपरगाव शहरासह ग्रामीण भागात महावितरणने थकबाकी वसुली मोहीम हाती घेतली असून मार्च महिना संपण्यापूर्वी नियमित वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली गेली आहे. यामुळे वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांना व वीजचोरांना आळा बसणार आहे. महावितरण कंपनीची थकबाकी वसुली मोहीम ग्रामीण व शहरी भागात राबवली जात असून यासाठी विशेष पथकांची नियुक्ती केली गेली आहे. भारनियमन करू नये म्हणून ग्राहक ओरड करीत असतानाच ग्राहकांकडूनच महावितरणचे कोट्यवधीची वीजबिले थकविले जात आहेत. त्यामुळे थकित वीजबिल वसुली मोहिमेसाठी महावितरण कंपनीतील वरिष्ठ व कनिष्ठ अभियंत्यांनी शहर व ग्रामीण भागात मार्चअखेरीपर्यंत 100 टक्के वसुलीचे टार्गेट होती घेतले आहे. ग्रामीण भागात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक ग्राहकांकडे मिळून एकूण 30 लाख लाख एवढी थकबाकी आहे. वेळोवेळी ग्राहकांकडून थकबाकी रक्कम न भरल्याने थकबाकी रकमेत वाढ होते. वाढत्या थकबाकीमुळे महावितरणचे पायाभूत सुविधा निर्मिती प्रकल्प रखडले असून, अन्य दैनंदिन समस्यांही वाढल्या आहेत. नियमित वीजबिल भरणाऱ्यांना नेहमीच योग्य वीजपुरवठा व अन्य सेवा देण्यास प्राधान्य दिले जाते आहे. थकबाकी भरली तरच महावितरणाचे काम व्यवस्थित चालणार आहे. त्यामुळे नागरिकांनी थकबाकी भरणे गरजेचे आहे, असे महावितरणचे संगमनेरमधील कार्यकारी अभियंता दत्तात्रय गोसावी यांनी सांगितले.