
मुस्लिम आरक्षणाचा प्रस्तावच अद्याप आलेला नाही. जो मुद्दा आमच्यासमोर आलेला नाही त्यावरून आदळआपट करण्याची गरज नाही. ज्यावेळी मुद्दा समोर येईल त्यावेळी सर्व बाजू तपासून घेतल्या जातील, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्या विरोधकांना ठणकावले. मराठा आरक्षणाबाबत सरकार कोर्टात पूर्ण ताकदीने लढतंय. धनगर आरक्षणाबाबत कालच विधान परिषदेत बोललो आहे. एनपीआर असो की एनआरसी, माझ्या राज्यातील कुणाचाही अधिकार मी हिरावू देणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’चे संपादकपद, शेतकरी कर्जमाफी तसेच मुस्लिम आरक्षणाबाबत विधान भवनातील पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. मुस्लिम आरक्षणाबाबत पत्रकारांनी विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, मुस्लिम आरक्षणासंदर्भात घोषणा केलेली नाही. ज्यावेळी तो विषय समोर येईल त्यावेळी बघू. त्यामुळे जे आदळआपट करीत आहेत त्यांनी आपली ऊर्जा वाया घालवू नये. मुद्दा येईल तेव्हा त्यासाठी ती राखून ठेवावी, असा टोला त्यांनी मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण करून पाहणाNया विरोधकांना लगावला. मुस्लिम आरक्षणाचा मुद्दाच आलेला नाही. त्यावर मी विंâवा शिवसेनेने कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. तो मुद्दा आल्यानंतर त्याची वैधता तपासून निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेससोबत युती म्हणून देवाचे दरवाजे बंद झालेले नाहीत
येत्या 7 तारखेला अयोध्येला जात आहे. श्रद्धा आणि भावना आहे म्हणून जात आहे. श्रीरामाचे दर्शन घेणार आहे, असे स्पष्ट करताना उद्धव ठाकरे यांनी राजकारण केले जात असल्याच्या टीकेचाही समाचार घेतला. देवाचं दर्शन घेण्यात राजकारण कुठून आलं. राष्ट्रवादी व काँग्रेससोबत युती केली म्हणून देवाचे दरवाजे बंद झालेले नाहीत. मी तर जाणार आहे. देव हा देव असतो. ज्या मंत्र्यांना सोबत यायचं असेल ते येतील. देवाचे दरवाजे सर्वांसाठी खुले असतात. त्यामुळे मित्रपक्षातील सदस्य माझ्यासोबतही येऊ शकतात आणि मी जाऊन आल्यानंतरही ते येऊ शकतात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
एनपीआरसाठी समिती
एनपीआरबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे. यासंदर्भात सरकारमधील जबाबदार सदस्यांची समिती नेमून नेमकं काय आहे ते समजून घेऊ. एनपीआर असो की एनआरसी माझ्या राज्यातील कुणाचाही अधिकार मी हिरावू देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुंबईचे नागरिक सजग आहेत!
दिल्ली दंगलीसारखी महाराष्ट्रात दंगल होऊ नये म्हणून मुंबईसह महाराष्ट्रात खबरदारी घेत आहोत. पोलीस यंत्रणा आणि मुंबईच्या नागरिकांना धन्यवाद देतो. ते सजग आहेत. त्यांच्यासाठी कोण काय करीत आहे हे त्यांना माहीत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी गोवंशसंदर्भात राज्य सरकारने निधी कमी केल्याचा आरोप भाजपकडून केला जात असल्याचे पत्रकारांनी विचारले असता, भाजपला पहिलं हे सांगावं सर्व राज्यांत हा कायदा लागू करावा. गोव्यामध्ये हा कायदा लागू करावा मग माझ्याशी बोलावं, असे प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले. कॅगचा अहवाल कधी सादर करणार या प्रश्नावर बोलताना कॅगचा अहवाल जाहीर करण्याच्या आधी राज्यपालांच्या परवानगीची आवश्यकता असते. नियम किंवा प्रथा बघून तो सभागृहासमोर सादर करू. कोणताही अहवाल जनतेच्या हिताचा असेल तर तो जनतेसमोर आला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शेतकऱ्यांची कर्जमाफी सर्वात मोठा निर्णय
उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमुक्तीबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, शेतकरी कर्जमुक्तीबाबत समाधान आहे, आनंद आहे. त्या आनंदाला एक बाजू आहे ती शेतकऱ्यांची आहे. डिसेंबरच्या अधिवेशनात कर्जमुक्ती जाहीर केली. याची अंमलबजावणी व्हायला दोन महिने लागले. यासाठी सहकार व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अधिकाNयांनी खूप मेहनत घेतली. आम्ही घाईने कोणतेही काम करीत नाही. त्यामुळे कर्जमुक्तीच्या यादीला थोडा उशीर लागला. शेतकरी कर्जमुक्तीचा निर्णय हा सर्वात मोठा निर्णय असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
शेतकऱयाला रांगेत उभं केलं नाही!
शेतकऱयांना धन्यवाद देतो. दोन महिन्यांत संयम सोडला नाही. सरकारवर विश्वास ठेवला म्हणून योजना राबवू शकलो. कर्जमुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकNयाला हेलपाटे मारावे लागले नाहीत. १०० पुरावे दाखवावे लागलेले नाहीत. नागरिकत्व सिद्ध करायला अनेक गोष्टी लागतात तसं शेतकNयाला रांगेत उभं केलेलं नाही, असा टोला लगावतानाच उद्धव ठाकरे यांनी या योजनेला ४०० महिने लागतील असे म्हणणाNया फडणवीसांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. 400 महिने ही योजना चालणार असे काही लोकांना वाटले होते, पण आता महिन्यांचे दिवस, दिवसाचे तास आणि तासाची मिनिटे आणि मिनिटाचे सेकंद आता कमी करावी लागतील. ही योजना पहिल्या सरकारची नाही नव्या सरकारची आहे. त्यामुळे जे दिवस ठरवून दिले आहेत त्याच्या आत ही योजना पूर्ण करायची आहे. माझा शेतकरी समाधानी राहील यासाठी प्रयत्न करीन, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कधी होणार?
पाथर्डीच्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलाला युवासेनेकडून तत्काळ मदत करण्यात आली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. शेतकNयासाठी जे जे काही करता येईल ते हे सरकार करतंय. शेतकरी आपल्या पायावर कसा उभा राहील ते बघतो आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच टीका करणाऱ्या विरोधकांनाही टोला लगावला पहिल्यांदा पंतप्रधान फसल विमा योजना का फसली? फसल शब्द मराठी की हिंदी माहीत नाही, पण ती का फसली. पंतप्रधानांची शेतकNयांचे उत्पन्न दुप्पट करण्याची योजना आहे ती कधी येतेय शेतकरी सन्मान योजना कशी चालली आहे ते बघत आहोत. ते एकदा झालं की त्याहून चांगलं काही करता येईल का, हेही बघू. शिवभोजन योजनेची व्याप्ती आम्ही वाढवत आहोत. आम्ही कोणतीही घिसाडघाई करीत नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
‘सामना’ची व्यवस्था ‘जैसे थे’! भाषा बदलणार नाही!
संजय राऊत हे ‘सामना’चे कार्यकारी संपादक आहेत. संपादकीय जबाबदारी त्यांच्यावरच राहील. ते आमच्या परिवारातले आहेत. यापुढेही ते जबाबदारी तशीच सांभाळतील.
‘सामना’, शिवसेना आणि ठाकरे ही तिन्ही नावं कधी वेगळी होऊ शकत नाहीत. म्हणून संपादकपदाची जबाबदारी सौ. रश्मी ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे. याचा अर्थ काही जण बोलतील की ‘सामना’ची भाषा बदलेल का, दिशा बदलेल का? तर तसं होणार नाही. ‘सामना’ हे शिवसेनेचे मुखपत्र आहे. अनेकदा शिवसेनेचा पक्षप्रमुख म्हणून माझी भूमिका, माझे मुद्दे, विचार ‘सामना’तून येत असतात. ते येतच राहतील. मातृभाषेप्रमाणेच ‘सामना’ची भाषा ही पितृभाषा आहे. त्यामुळे ती तशीच राहील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
‘सामना’ हे शिवसेनेचे मुखपत्र आहे. त्यामुळे भाषा तीच राहणार. संपादकपद ही आमची अंतर्गत मांडणी आहे. ‘सामना’च्या संपादकपदाची भाषा ही पितृभाषा आहे. पुन्हा असे म्हणू नका की रश्मी ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली, अशी मिश्कील टिप्पणी करताना उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’मध्ये माझे आणि शिवसेनेचेच विचार असतात, असे स्पष्ट केले.
‘सामना’पासून दूर व्हावं लागतं याचं शल्य
एखादी गोष्ट तळमळीने करतो, जीवापाड मेहनत घेऊन करतो. काही काळ त्यापासून दूर व्हावं लागतं याचं एक शल्य असतं ते म्हणजे ‘सामना’ची संपादकपदाची जबाबदारी. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी अनपेक्षितपण आली. त्यामुळे ‘सामना’चं संपादकपद आणि रमाधामची जबाबदारी यापासून मला दूर व्हावं लागलं, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
































































