पालिका कर्मचाऱ्यांनाही पाच दिवसांचा आठवडा? लवकरच निर्णय होण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आता मुंबई महानगरपालिकेच्या कामगारांसाठी पाच दिवसांचा आठवडा सुरू करण्यासाठी पालिका प्रशासनाने कार्यवाही सुरू केल्याचे समजते. आयुक्तांच्या अंतिम मंजुरीनंतर तातडीने अंमलबजावणी होणार असल्याचे समजते.

राज्य सरकारच्या 24 फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवस आठवडा सुरुवात करण्यात आली आहे. याच धर्तीवर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही पाच दिवसांचा आठवडा होणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. यानुसार पालिका प्रशासनही आपल्या कर्मचाऱ्यांसाठीदेखील पाच दिवसांचा आठवडा सुरू करणार असल्याचे समजते.

नियमित कर्मचाऱ्यांना सोमवार ते शुक्रवारी सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 अशी कार्यालयीन वेळ राहील. तर ‘ड’ वर्ग कर्मचाऱ्यांना सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.30 अशी वेळ राहील. यामध्ये दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त कमाल अर्धा तास जेवणासाठी वेळ दिला जाईल. ह अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आठवडा आणि कामाची वेळ पूर्वीप्रमाणेच राहणार आहे. मात्र त्यांना दुसरा आणि चौथ्या शनिवारी सुट्टी राहील.