वैद्यकीय प्रवेशाची 70:30 प्रक्रिया रद्द करा, राज्य सरकार न्यायालयात सकारात्मक भूमिका मांडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील उर्वरित महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ येथील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या 70:30 ही कोटा पद्धत रद्द करा, अशी आग्रही मागणी मंगळवारी विधानसभेत आमदारांनी केली. हा कोटा रद्द करण्यासंदर्भात न्यायालयात राज्य सरकार सकारात्मक भूमिका मांडेल. याप्रकरणी विशेष बैठक बोलावूनही मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले.