न्यायव्यवस्था स्वतंत्र करायची असेल तर न्यायाधीशांना लाच देणारी लॉबी तोडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

न्यायालयातील निकाल फिरविण्यासाठी लाच दिली जाते. या लोकांची एक लॉबीच या क्षेत्रात कार्यरत आहे. न्यायव्यवस्था स्वतंत्र करायची असेल तर न्यायाधीशांना लाच देणारी ही लॉबी तोडण्याची गरज असल्याचे मत माजी सरन्यायाधीश व नवनियुक्त राज्यसभा सदस्य रंजन गोगोई यांनी व्यक्त केले.

एखाद्या प्रकरणात मनाप्रमाणे घडत नसेल किंवा बाजूने निकाल लागण्याची शक्यता नसल्यास लाच देऊन न्यायालयातील खटला थांबविण्यास भाग पाडले जाते. शक्य असणाऱया प्रत्येक मार्गाने न्यायाधीशांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो. लाच देऊन न्यायव्यवस्थेला बदनाम करणारी ही लॉबी तोडण्याची आवश्यकता असल्याचे गोगोई म्हणाले. माजी सरन्यायाधीश गोगोई यांच्या राज्यसभेवरील नियुक्तीला काँग्रेससह अन्य विरोधकांनी कडाडून विरोध केला आहे. यावर गोगोई म्हणाले की, राज्यसभा सदस्यत्व ही सरकारने दिलेली भेट नाही.