
भाजपच्या ज्येष्ठ नेत्या, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांचा मुलगा खासदार दुष्यंत सिंह यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अहवाल निगेटिव्ह आला असला तरी या दोघांनीही पुढिल काही दिवस स्वत:ला विलगीकरणात ठेवण्याचे ठरवले आहे. वसुंधरा राजे यांनी स्वत: सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे.
मुझे बताते हुए खुशी हो रही है कि #Covid19 टेस्ट की मेरी रिपोर्ट नेगेटिव आई है। हालांकि सावधानी के तौर पर दुष्यंत और मैं अगले दो सप्ताह तक आइसोलेशन में ही रहेंगे।
— Vasundhara Raje (@VasundharaBJP) March 21, 2020
शुक्रवारी बॉलिवूडची गायिका कनिका कपूर ही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. काही दिवसांपूर्वी लखनौ मध्ये झालेल्या एका पार्टी मध्ये ती सहभागी झाली होती. या पार्टीत वसुंधरा राजे आणि त्यांचा मुलगा दुष्यंत दोघेही सहभागी झाले होते. त्यामुळे कनिका पॉझिटीव्ह असल्याचे समलत्यांनी स्वतःला आयसोलेट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी देखील झाली. त्या चाचणीचा अहवाल नेगिटीव्ह आला आहे. अहवाल निगेटिव्ह आला असला तरी या दोघांनीही पुढील दोन आठवडे स्वत:ला विलगीकरणात ठेवले आहे.
कनिका 15 मार्चला लंडनवरून लखनौला आली होती. परंतु विमानतळावरील ग्राउंड स्टाफच्या मदतीने वॉशरूममध्ये लपून तिने तिथून पळ काढला होता. यानंतर तिने रविवारी एका पार्टीचे आयोजन केले होते आणि या पार्टीत तिच्या अपार्टमेंटमधील लोकांसह, लखनौ शहरातील अनेक मोठे अधिकारी, नेते सहभागी झाले होते. आता कनिका कपूर हिला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
लखनौला आल्यानंतर कनिका कपूर ताज हॉटेलमध्ये थांबली होती आणि तिने आपल्या अपार्टमेंटमध्ये पार्टी आयोजित केली होती. कनिका कपूरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने या पार्टीत सहभागी झालेले लोक, नौकर-चाकर दहशतीखाली आहेत. तसेच अपार्टमेंटमधील लोक घर सोडून दुसरीकडे जात आहेत. या अपार्टमेंटमध्ये कनिका कपूर हिचे संपूर्ण कुटुंब राहते आणि या सर्वांना आता क्वारंटाइन करण्यात येत आहे. तसेच आरोग्य विभागाने कनिकाच्या संपर्कात आलेल्या सर्वांना फोन करून सेल्फ आयसोलेट होण्यास सांगितले आहे. लंडनवरून आल्या नंतर कनिका 3 ते 4 पार्टीमध्ये गेली होती. या दरम्यान ती 300 ते 400 लोकांच्या संपर्कात आल्याचा दावा राजीव कपूर यांनी आज तकशी बोलताना केला
























































