गडहिंग्लजमध्ये नमाजसाठी जमलेले सातजण ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शुक्रवारची नमाज अदा करण्यासाठी जमलेल्या सात जणांवर गडहिंग्लज पोलीसानी कारवाई केली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशव्यापी संचारबंदी आणि लॉकडाऊन आहे. शुक्रवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. गेले दहा दिवस गडहिंग्लज आणि परिसरात खूपच चांगल्या रितीने संचारबंदी पाळण्यात आली. दरम्यानच्या काळात पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास तीनशे वाहने जप्त करण्यात आली. जमावबंदीच्या आदेशाचे काटेकोर पालन सुरू होते मात्र आज दुपारच्या सुमारास शहराच्या मुख्य रस्त्यावरील जामा मशिदीमध्ये काहीजण नमाजसाठी जमा झाल्याची माहिती मिळाली. पोलीसानी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता समोरील दरवाज्याला कुलूप लाऊन मागील दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. कारवाईच्यावेळी त्यातील काहीजण पळून गेल्याचे कळते. मात्र सात जणांना ताब्यात घेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर कारवाई सुरू होती. मात्र सोशल मीडियावर याचा प्रचंड उद्रेक सुरू होता. संबंधितांवर कडक कारवाई व्हावी यासाठी मेसेज सुरू होते.