बीडमध्ये औषध दुकानदारांचा आडमुठेपणा, भयावह परिस्थितीत संपूर्ण दुकाने बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
kalyan-shop-closed
प्रातिनिधिक फोटो

बीड येथील एका मेडिकल दुकानदारास नगर पालिकेच्या कर्मचाऱ्याने मारहाण केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल होत नसल्याने मेडिकल असोसिएशनने अशा भयावह परिस्थितीमध्ये आपला हट्ट धरत शहरातील मेडिकल दुकान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शनिवारी दिवसभर रुग्णांचे हाल झाल्याने सामान्य जनतेत संताप व्यक्त होत आहे.

बीड शहरातील बशीरगज भागातील एका मेडिकल स्टोअरमध्ये मोठी गर्दी होत होती. लॉकडाऊनच्या काळात शिस्त पाळली जावी म्हणून नगर पालिका कर्मचारी शहरात फिरत होते. या दुकानात नगरपालिका कर्मचाऱ्यासोबत बाचाबाची झाली त्या नंतर या कर्मचाऱ्याने दुकानदारास किरकोळ मारहाण केली. मारहाण प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली. मात्र गुन्हा दाखल करून न घेतल्याने मेडिकल असोसिएशनने दुकान बंदचे आवाहन केले. त्यामुळे औषधांचे दुकान शनिवारी बंद राहिल्याने रुग्णाची मोठी कुचंबणा झाली. या प्रकरणी सामान्य जनतेतून संताप व्यक्त होत आहे.