
नगर इथल्या जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या एनआयव्हीकडे पाठविलेल्या 73 स्त्राव चाचणी नमुन्याचे अहवाल प्राप्त झाले असून त्यात 3 जण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. यात नगर शहरातील 2 जण तर राहाता तालुक्यातील लोणी प्रवरा येथील एकाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाची संख्या आता 20 झाली आहे.
कोरोना बाधित आढळलेल्या व्यक्तींमध्ये नगर शहरातील एक व्यक्ती 76 वर्षीय तर दुसरी व्यक्ती 35 वर्षीय आहे लोणी प्रवरा येथील व्यक्ती 46 वर्षीय आहे. कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याने यांना लागण झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी सांगितले.
सुरुवातीला आज सायंकाळी 73 पैकी 35 स्त्राव चाचणी अहवाल पुणे येथून प्राप्त झाले. त्यात, केवळ एक व्यक्ती बाधित असल्याचे स्पष्ट झाले. सायंकाळी पुन्हा उर्वरित 38 स्त्राव चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यात आणखी दोघे बाधित असल्याचे स्पष्ट झाले.



























































