
कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना हा आजार पूर्णपणे बरा होतो. असे असले तरी नागरिकांमध्येही भितीचे वातावरण आहे. केरळमध्ये एका कोरोना संशयित रुग्णाने आत्महत्या केली आहे. तर महाराष्ट्रात एका कोरोना रुग्णाने आपली जीवनयात्रा संपवली आहे.
केरळच्या अरियालुरमध्ये एक कोरोना संशयित रुग्ण आढळला होता. सुरूवातील त्याला ताप आणि खोकल्याचे लक्षणे दिसत होती. म्हणून त्याला विलगीकरण कक्षात ठेवले होते. कोरोना टेस्ट साठी त्याच्या घशाच्या स्रावाचे नमुनेही घेतले होते. परंतु सदर रुग्ण खूप तणावाखाली होता. रिपोर्ट येण्यापूर्वीच त्याने विलगीकरण कक्षात आत्महत्या केली. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
अकोल्यात एका कामगाराला कोरोनाची लागण झाली. हे कळताच त्याने आत्महत्या केली. सदर व्यक्ती एक कामगार होता. त्याचे वय 30 वर्ष होते. शुक्रवारी त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण्ण झाले. तेव्हा स्वतःचा गळा कापून त्याने आत्महत्या केली. अकोल्यातच एका सरकारी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते.



























































