
दिवसागणिक कोरोनाचे थैमान वाढत असून ठाणे पोलीस दलातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामध्ये कोरोनासदृश्य लक्षणे आढळल्याने खळबळ उडाली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातील संवेदनशील परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी या अधिकाऱ्याची ड्युटी होती. काही दिवसांपूर्वी त्यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने ते सुट्टी घेऊन नाशिकला गेले होते. तेथे त्रास वाढू लागल्याने त्यांना नाशिकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अधिकाऱ्याला कोरोना सदृश्य लक्षणांचा त्रास होत असला तरी कोरोनाची लागण झालीय की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
ठाणे शहरातील संवेदनशील परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात काही तबलिगी आले होते. त्यांना शोधून काढण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्याने विशेष प्रयत्न केले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांना अचानक रक्तदाब आणि इतर त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांनी सुट्टी घेऊन नाशिक येथील घर गाठले. तेथे अधिक त्रास होऊ लागल्याने त्यांना नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. या अधिकाऱ्यास कोरोनासदृश्य लक्षणांचा त्रास जाणवत असला तरी कोरोना लागण झालीय की नाही हे स्पष्ट नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेने पोलीस वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

























































