कल्याणच्या मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्याण शहरातील रेल्वे स्थानकाजवळ मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत सतत गर्दी असते. रात्री उशिरापर्यंत हा रस्ता गर्दीने फुलून गेलेला असतो. फेरीवाले, हातगाड्या तसेच भाजी मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे सतत गजबजणारी बाजारपेठ ‘लॉक’ करण्यात आली आहे. या रस्त्यावरून वाहनेच काय पण चिटपाखरूही जात नाही. शिवाजी चौकात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून वाहतूक शाखेच्या पोलिसांनी मोहम्मद अली चौकात बांबू टाकून रस्ता बंद केला आहे.