लोकनेते सोळंके कारखान्याच्या वतीने हॅण्ड सॅनिटायझरचे उत्पादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजलगाव मतदारसंघात असलेल्या लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याने शनिवारपासून देशात सध्या गरजेच्या बनलेल्या हॅण्ड सॅनिटायझरच्या उत्पादनास सुरुवात केली आहे.

याबाबत कारखान्याचे चेअरमन.धैर्यशील सोळंके म्हणाले की , कोरोना व्हायरसचा संसर्ग होवु नये यासाठी हॅण्ड सॅनिटायझरचा वापर मोठया प्रमाणात होऊ लागल्यामुळे बाजारामध्ये त्याची टंचाई निर्माण झालेली आहे. ही टंचाई दुर करण्यासाठी शासनाने ज्या कारखान्याकडे डिस्टलरी प्रकल्प आहे अशा कारखान्यांना हॅण्ड सॅनिटायझर उत्पादन करण्यासंबंधी आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद व सामाजिक व राष्ट्रीय कार्यात सहभाग या उद्देशाने तातडीने कारखाना व्यवस्थापनाने हॅण्ड सॅनिटायझर उत्पादनाचा निर्णय घेतलेला असुन त्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाने नुकतीच परवानगी दिलेली आहे .त्यामुळे कारखान्याचे डिस्टलरी प्रकल्पाचे माध्यमातुन रत्नसुंदर या नावाच्या हॅण्ड सॅनिटायझरचे उत्पादन घेण्यास सुरुवात केलेली आहे . तयार होणारे सॅनिटायझर लवकरच बाजारामध्ये वाजवी दरात उपलब्ध करुन देण्याचे कारखाना व्यवस्थापनाचे धोरण आहे .असेही सोळंके यांनी सांगितले.