
देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. त्यामुळे देशातील किमान 62.5 जनतेकडे राशन, औषधांसारख्या अत्यावशक वस्तू घेण्यासाठी पैसे उरले नाहीत. IANS या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार कोविड ट्रॅकर्स इंडेक्स पॅनिक या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. 37.5 टक्के लोकांनी सांगितले की त्यांच्याकडे तीन आठवडे पुरतील इतके पैसे आहेत.
Women, the Muslim community, old age people and those in the low income groups are highly optimistic & believe that #Covid19, which has wrecked havoc in the country, will subside & things will begin to improve soon, IANS C-Voter Covid Tracker’s Index of Panicn survey revealed. pic.twitter.com/VGBNjknQUQ
— IANS Tweets (@ians_india) April 11, 2020
केंद्र सरकारने जारी केलेला लॉकडऊन 14 एप्रिल रोजी संपणार आहे. त्यानंतर कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊनचा कार्यकाळ वाढवू शकतात. सर्वेक्षणानुसार कमी उत्पन्न असणारे, महिला, मुस्लिम समाजातील लोक, वृद्ध नागरिक आणि कमी शिक्षण असणार्यांची अवस्था बिकट आहे. बहुतांश लोकांकडे राशन, औषधं घेण्यासाठी तीन आठवड्यांपुरतेच पैसे आहेत.
या दरम्यान ग्राहकांना EMI च्या व्याजावर सूट देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि वकील अमित साहनीए यांनी न्यायालयात याचिका दाखल केली असून कर्जाच्या हफ्त्यांवर अतिरिक्त व्याज आकारला जाऊ नये अशी मागणी केली आहे. जर कोर्टाने याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल दिला तर ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे.






























































