आंबेडकर जयंतीनिमित्त ‘एक देश एक आवाज’ उपक्रम, &TV चे कलाकार देणार मानवंदना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दरवर्षी 14 एप्रिल हा दिवस आंबेडकर जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी हिंदुस्थान इतिहासामधील एका अद्वितीय नेत्याची जयंती साजरा केली जातो. त्यांचे जीवन व वारसा अनेकांसाठी प्रेरणास्रोत राहिला आहे.

यंदाच्या आंबेडकर जयंतीनिमित्त &TV ने बाबासाहेबांना आणि त्यांच्याच संघटित हिंदुस्थानाच्या दृष्टिकोनाला खास मानवंदना देण्यासाठी ‘एक देश एक आवाज’ उपक्रम सादर केला आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून चॅनेल सर्वांना भीमवंदनासाठी एकत्र येण्या्चे आणि 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता फक्ता &TV वर बाबासाहेबांना खास मानवंदना देण्याचे आवाहन करत आहे.

&TVवरील कलाकार प्रसाद जवादे, नेहा जोशी, स्नेहा वाघ, रोहिताश्व गौड, आसिफ शेख, ग्रेसी सिंग, योगेश त्रिपाठी या कलाकारांनी डॉ. आंबेडकर हे लोकशाहीचे सर्वात मोठे प्रेरणास्रोत आहेत. देशाला संघटित बनवण्यासाठी संविधानासारखी एक महत्त्वाची गोष्ट देशाला दिली आणि त्याच आधारावर आपला देश एक उत्तम लोकशाहीवादी देश म्हणून प्रगती करत आहे, अशा भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच त्यांच्या या अजोड कामगिरीला मानवंदना देण्यासाठी चॅनेलच्या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहनही या कलाकारांनी केलं आहे.