
मुंबईत गेल्या 24 तासांत 204 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 1753 वर आणि मृतांचा आकडा 111 वर गेला आहे.
मुंबईत पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयासह इतर रुग्णालयांत केलेल्या कोरोना चाचणीत 14 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत 385 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये 204 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तर 11 जण मृत झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली 11 मृतांमध्ये 9 जणांना दीर्घकालीन आजार होते. तर दोघांच्या मृत्यूला वार्धक्य कारणही कारणीभूत ठरल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. त्यामुळे दीर्घकालीन आजार आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी घ्यावी असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
https://www.saamana.com/corona-live-update-in-maharashtra-cm-uddhav-thackeray/
एकाच दिवसांत 23 जण कोरोनामुक्त
गेल्या 24 तासांत 204 नवीन रुग्ण सापडले असले तरी 23 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांच्यावर आता पालिकेच्या डॉक्टरांच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. दरम्यान, आतापर्यंत 164 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी घाबरून जाऊ नये, मात्र काळजी घ्यावी असे आवाहन पालिकेने केले आहे.


























































