केरळमधील हाऊसबोटचे रुपांतर होणार विलगीकरण कक्षात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळमध्ये पर्यटनात हाऊसबोटचे अनन्य साधारण महत्व आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने या हाऊसबोट अशाच पडून आहेत. या हाऊसबोटचा वापर आता विलगीकरण कक्षासाठी होणार आहे. राज्य सरकारने हाऊसबोट मालकांशी त्याबाबत बोलणीही केली आहे.


केरळच्या अलपुझा जिल्ह्यात परवाना असलेले 700 हाऊसबोट्स आहेत. या हाऊसबोट्समध्ये 2 हजार विलगीकरण कक्ष सुरू होऊ शकतात. हाऊसबोट मालकांशी चर्चा झाली असून एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत हे कक्षा कार्यरत होतील अशी माहिती मंत्री सुधाकरन यांनी दिले आहे.

हाऊसबोट मालक चालक संघटनेचे अध्यक्ष केवीन रोझारिया म्हणाले की “विलगीकरण कक्षासाठी आम्ही बोट देत आहोत याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून केरळमधील पर्यटन व्यवसाय ठप्प आहे. आमच्या बोट्सचे रुपांतर विलगीकरण कक्षात होणार आहे. याचा अर्थ कोरोनाशी सुरू असलेल्या लढ्यात आमचाही सहभाग आहे. याबाबत सरकारशी जी काही मदत असेल ती आम्ही करू असे रोझारिया म्हणाले.