
नगर जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यापैकी 21 जणांचे स्त्राव चाचणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. गुरुवारी पाठवलेले 13 आणि शुक्रवारी पाठविण्यात आलेले 20 अशा एकूण 33 स्त्राव अहवालाची अद्याप प्रतीक्षा असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यात सारीचेही रुग्ण आढळत असून 11 एप्रिलपासून शुक्रवारपर्यंत 42 रूग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय आणि महात्मा फुले जीवनदायी योजनेतंर्गत मान्यता दिलेल्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.























































