चंद्रपूर- कोरोनाच्या संकटातही सार्वजनिक ठिकाणांवर गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचं संकट कायम असतानाही सार्वजनिक ठिकाणं गर्दीनं कशी फुलून येत आहेत, याच विदारक चित्र आज पहाटे चंद्रपूर बाजार समितीमध्ये बघायला मिळालं. बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याच्या वाहनांना आणि खरेदीला परवानगी असल्यानं भाजी व्यापारी आणि किरकोळ विक्रेते मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत.

पहाटे चार वाजेपासून भाजीपाल्याची वाहनं बाजार समितीत येतात. स्थानिक व्यापारी, ठेल्यावर विक्री करणारे किरकोळ विक्रेते आणि कमी दराच्या लालसेनं जाणारे स्थानिक नागरिक, या सर्वांची एकाचवेळी झुंबड उडते. सामाजिक दुरत्वाचं भान या गर्दीत दिसलं नाही. ही सगळी गर्दी पहाटे चार ते सहा या वेळातच होत असल्यानं पोलीस किंवा इतर यंत्रणा याकडे दुर्लक्ष करीत आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण नाही. मात्र असं बेभान वागणं आपल्या अंगलट येऊ शकतं, याची नागरिक जराही पर्वा करत नसल्याचं चित्र दिसत आहे.