
कोरोनाविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुकारलेल्या लढाईत अनेक मदतीचे हात पुढे येत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आतापर्यंत अनेकांनी सढळहस्ते मदत केली असून मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड19 या स्वतंत्र खात्यात आतापर्यंत 251 कोटी रुपये जमा झाले आहेत. आज एडल वाइज कंपनीतर्फे 50 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सैयदना बुरहानी ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दोन कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. तर
राज्यात सुरु असलेल्या कोरोनाविरोधातील लढाईसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदतीसाठी आवाहन केले होते. या आवाहनाला उत्स्र्पâत प्रतिसाद देण्यात येत आहे. आज यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून 10 कोटी रुपयांची मदत करण्यात आली. त्याचप्रमाणे सैयदना बुरहानी ट्रस्टच्या वतीने दोन कोटींची मदत देण्यात आली आहे. दाऊदी बोहरा समाजाच्यावतीने देशभरात विविध स्वरूपात मदत करण्यात येत असून आतापर्यंत 8 लाख 33 हजार 243 लोकांना त्याचा फायदा झाला असल्याचेही ट्रस्टच्यावतीने कळविण्यात आले आहे. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची शिखर संस्था म्हणून काम करणा्रया महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाने कोरोना विरुद्धच्या लढयासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला 30 लाख रुपयांची मदत केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सर्व दात्यांचे मनापासून आभार व्यक्त करताना सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून आपण कोरोना विषाणुच्या संकटावर नक्कीच मात करू असा विश्वास पुन्हा एकदा व्यक्त केला आहे.


























































