लॉकडाऊन काळात चीनलगतच्या पुलाची विक्रमी वेळेत दुरुस्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अरुणाचल प्रदेशातील सुबानसिरी जिल्ह्यातील चीन सीमेलगतच्या सुबानसिरी नदीवरील लष्करी महत्वाच्या पुलाची दुरुस्ती कोरोना लॉकडाऊन पुलाच्या काळात विक्रमी वेळेत करण्याचा पराक्रम सीमा सडक संघटनेच्या अभियंत्यांनी साकारला आहे.

मध्यंतरी झालेल्या अपघातानंतर दुरुस्तीसाठी हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. देशाच्या पहाडी दुर्गम भागात जीवनावश्यक वस्तू आणि संकटाच्या काळात सैनिक, लष्करी सामुग्री वेगाने पुरविण्यासाठी हा पूल अतिशय महत्वाचा ठरला आहे. पुलाच्या नूतनीकरणानंतर त्याचे नाव अशोक चक्र विजेते हंगपम दादा ठेवण्यात आले आहे.

हिंदुस्थानी लष्करातील बहादूर जवान हंगपम हे कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले होते.सोमवारी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांनी व्हिडियो कॉन्फरन्सिंगने पुलचे उदघाटन करीत तो वाहतुकीसाठी खुला केला.