
गस्तीवर असलेल्या पोलीस शिपायांनी मंगळवारी 85 हजार रुपयांचा गुटखा घेऊन जाताना दोघांना पकडले. हा गुटखा परभणीच्या दिशेने एका कारमधुन नेला जात होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना बंदोबस्तासाठी तैनात असलेले विनोद रत्ने, सुनिल बोराडे, अक्षय वाघ हे पोलीस कर्माचारी मंगळवारी पहाटे 5 च्या सुमारास पूर्णा – झिरोफाटा रस्त्यावर मॉर्निंगवॉकला जाणार्या नागरीकांना पकडण्यासाठी गेले होते. या दरम्यान पूर्णा शहरातून परभणीच्या दिशेने निघालेल्या एका चारचाकी वाहनाची त्यांनी तपासणी केली. या गाडीत मागील बाजूला गुटख्याचे पाच पोते आणि तीन पुडे असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी गाडीच्या चालकासह एकाला ताब्यात घेतले आहे. गुटख्याची माहिती अन्न व औषधी प्रशासनाला कळविण्यात आली आहे.



























































