सोलापूरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 50 वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना रुग्णांची संख्या आता सोलापूर शहरात 49 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातही 1 रुग्ण शनिवारी पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधिताची संख्या 50 वर पोहचली आहे. त्यातील चार जणांचा आधीच मृत्यू झाला आहे. तर 46 जणांवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शनिवारी ही माहिती दिली.

शनिवारी एकूण 9 रुग्णांची वाढ झाली. त्यात चार सोलापुरातील शांतीनगर भागातील तर कुमठा नाका, लष्कर येथील प्रत्येकी एक, तर मोदी भागातील दोन जणांचा समावेश आहे. यातील पाच जण सारीचे संक्रमण झाल्याने दाखल झाले होते. त्यांच्या चाचण्याही कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. आत्तापर्यंत 1129 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. त्यातील 987 जणांचे अहवाल मिळाले आहेत. त्यात 937 निगेटिव्ह तर 50 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. अजून 142 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. सांगोल्यात तालुक्यातील ज्या गावात शनिवारी रुग्ण आढळला तो परिसर सील करण्यात आला असून त्याच्या संपर्कातील लोकांची माहिती गोळा करणे सुरू आहे.