5 वर्षीय बालकाला कोरोनाची बाधा, हिंगोलीची रुग्ण संख्या झाली 14

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंगोली जिल्ह्यात मागिल आठच दिवसात 14 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मंगळवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार सेनगाव येथील 5 वर्षीय बालकाला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली आहे.

मालेगाव व मुंबई येथे बंदोबस्ताला गेलेल्या एसारपीएफ जवनांपैकी 12 जण कोरोना पॉजीटीव्ह आढळले आहेत. यामध्ये हिंगोलीचे 11 तर जालना येथून आलेल्या एका जवानाचा समावेश आहे. जालना येथील जवानाच्या संपर्कात आलेल्या एका व्यक्तीला देखील कोरोनाने ग्रासले आहे. तर आज मंगळवारी सकाळी हिंगोली जिल्ह्याची चिंता वाढवणारा अहवाल प्राप्त झाला. सेनगाव येथील विलगीकरण कक्षात ठेवलेल्या 5 वर्षीय बालकाला कोरोनाची बाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. या बालकाची ट्रॅव्हल हिस्ट्री शोधली जात असून बालकाच्या संपर्कातील व्यक्तींचे लाळेचा नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.